Breaking News

बेलपिंपळगाव जि. प. शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात


नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे जिल्हा परिषद गट बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके होते. बेलपिंपळगाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत यावेळी गटातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला. यावेळी चिमुकल्या मुलांनी शाळेत अनेक दुकानांचे स्टॉल लावले होते यावर खरेदी करण्यासाठी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती.

मुलांनी अनेक कलाकुसर केलेल्या वस्तू विक्री साठी ठेवल्या होत्या. सकाळी जिल्हा परिषद सदस्य शेळके, पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर, कैलास झगरे , संभाजी पवार केंद्र प्रमुख यासह अनेक मान्यवर यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी0 बोलताना शेळके यांनी सांगितले की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात टाकत असून प्रगती करत आहेत ,पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर,राजेंद्र साठे ,चंद्रशेखर गटकळ यांनीॉ यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

बेलपिंपळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सध्या पूर्णपणे डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे काही वर्ग झाले असून उर्वरित वर्ग काही दिवसात काम होईल असे केंद्र प्रमुख संभाजी पवार यांनी सांगितले, या कार्यक्रमा साठी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर, कैलास झगरे,विलास साठे गट शिक्षणाधिकारी, दगडू तळपे शिक्षक विस्तार अधिकारी,शंकरराव गाले शिक्षण विस्तार अधिकारी, संभाजी पवार केंद्र प्रमुख, रजनी पंडुरे केंद्र प्रमुख, शिक्षक बँक माजी अध्यक्ष कल्याण शिंदे,राजाभाऊ बेहळे, राजेंद्र मुंगसे,पांडुरंग काळे,रामेश्‍वर चोपडे,राजेंद्र साठे,बाळासाहेब तर्‍हाळ,सामजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ, सुभाष साठे ,बाळासाहेब शिंदे,बापूसाहेब औटी,डॉ घावटे, गणपत गटकळ ,यासह अनेक मान्यवर व शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ ,महिला उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बेलपिंपळगाव शाळेतील मुख्याध्यापक बुधा गोढे, कचरू भालेराव, शरद पवार, सुरेश पंडुरे,अण्णासाहेब कोकणे,कुमार कानडे, दीपक पवार, सुरेश मतकर ज्योती नांदे यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता सदर कार्यक्रम प्रसंगी मुलांना व पालकांना स्नेहभोजन ठेवले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार कानडे यांनी केले तर आभार शरद पवार यांनी मानले.