पुणे : अस्तित्वात नसलेल्या दुकानाच्या नावाने बनावट कोटेशन तयार करून त्याआधारे 24 लाख रुपयांचे कर्ज घेऊन कर्जाचे हप्ते न भरता विमाननगर येथील सारस्वत बँकेची 24 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संजय खरे यांनी फिर्याद दिली असून विमानतळ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना 29 ऑक्टोबर 2016 पासून घडत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी उन्नती मोटर्स. फातीमानगर, पुणे या नावाचे बनावट कार कोटेशन तयार करून त्यामध्ये रेनॉल्ट लॉजी या कारची किंमत जास्त दाखवून सारस्वत बँकेकडून कर्ज घेतले. प्रत्यक्षात उन्नती मोटर्स या नावाने कुठेही शोरूम नाही. शिवाय आरोपींनी उन्नती मोटर्स या नावाने अॅक्सीस ब ँकेत बोगस खातेही उघडले होते. आरोपींनी कारसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते न भरता सारस्वत बँकेची 24 लाख एक हजार 64 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक कोलते अधिक तपास करीत आहेत.
सारस्वत बँकेची 24 लाख रुपयांची फसवणूक
Reviewed by Dainik Lokmanthan
on
22:11
Rating: 5