जाहिरात वितरणाच्या पक्षपातीपणामुळे एडिटर्स फोरमची याचिका
महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जाहिरात वितरणामध्ये पक्षपात होत असल्याने एडीटर्स फोरममार्फत यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्र. 513/2018 दाखल करण्यात आली होती. सदर याचिका न्यायालयामध्ये असताना दि. 18 फेबु्रवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई येथे आले होते, त्यावेळी नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018, कथा परिवर्तनाची, दर्शन समृद्धीचे, बदलत्या महाराष्ट्राचे या कोट्यवधी रूपयांच्या जाहिराती केवळ विशिष्ट वर्तमानपत्रांना तसेच शासनाच्या जाहिरात यादीवर नसलेल्या वर्तमानपत्रांना देण्यात आल्या, मुळ याचिकेला जोडून एडिटर्स फोरमने पुन्हा शॉर्ट एफेडेविट सीएचएसडब्ल्यूएसटी/122/2018 दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. शंतनू केमकर आणि न्या. एम.एस. कर्णीक यांचेसमोर काल सदर याचिका सुनावणीस आली असता, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश तळेकर यांनी केलेल्या युक्तीवादानंतर दोन्ही न्यायमुर्तींनी जाहिरात धोरणाची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करत मुख्य सचिव, सचिव सामान्य प्रशासन(मा.व.ज.), सचिव महसूल व वन, सचिव ग्रामिण विकास, सचिव समाजकल्याण, बस्ट प्रशासन, सचिव नगर विकास, महासंचालक माहिती व जनसंपर्क, आयुक्त समाज कल्याण, सर्व संचालक, उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क, आयुक्त(महसूल) सर्व, आयुक्त मुंबई मनपा, आयुक्त नागपूर मनपा, आयुक्त विक्रीकर विभाग, जिल्हा माहिती अधिकारी वर्धा, व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष सिडको, मुख्यकार्यकार अधिकारी एम.आय.डी.सी यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. एडिटर्स फोरम मार्फत तळेकर अॅन्ड असोसिएटस् तर्फे सतिश तळेकर, अॅड. प्रज्ञा तळेकर, अॅड. माधवी ऐयपावन यांनी काम पाहिले.