Breaking News

डॉ. अनिता अंत्रे यांना नारी पुरस्कार


लोणी /प्रतिनिधी - पतियाला पंजाब, हिमाक्षरा आणि हिंदी भाषा संमेलन यांच्यावतीने दिला जाणारा नारी गौरव पुरस्कार शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ राहुरी येथील हिंदी विभाग प्रमुख डाॅ. अनिता मधुकर अत्रे यांना नुकताच पंजाब याठिकाणी प्रदान करण्यात आला. पंजाब येथील हिंदी अभ्यासक डॉ. वर्षा पुनवटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. अनिता अंत्रे यांनी यांनी हिंदी भाषेवर केलेले संशोधन आणि हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार यांची दखल घेऊन हा पुरस्कार पुरस्कार पतियाला येथील हिंदी संशोधन केंद्राच्यावतीने देण्यात आला.त्यांच्या या यशाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, युवानेते डाॅ. सुजय विखे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे, प्राचार्य डॉ. संभाजीराव पठारे आदींनी अभिनंदन केले आहे.