Breaking News

संग्रामपूर नगर पंचायतचा ’लेखापाल’ एसीबीच्या जाळ्यात

बुलडाणा, दि. 19, मार्च - जिल्ह्यातील संग्रामपूर नगर पंचायतच्या प्रभारी लेखापालाला आज 18 मार्च ला एक हजाराची लाच घेताना बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून हि कारवाई केली. नंदलाल छगन राठोड (39) असं अटक करण्यात आलेल्या लाचखोर लेखापालाच नाव आहे. या प्रकरणातील तक्रारकर्ते हे खाजगी ठेकेदार आहेत त्यांनी त्यांचे जेसीबी द्वारे केलेल्या कामाचे बिल चेक काढून दिला त्यापोटी बक्षीस म्हणून लाचेची मागणी केली होती. दरम्यान याची तक्रार तक्रारदार यांनी बुलडाणा येतील लाच लुचपत विभागाकडे केली होती. आज दुपारी लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून आरोपी नंदलाल राठोड याला एक हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. हि कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. आरोपी नंदलाल राठोड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.