Breaking News

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्यावीच लागेल

सोलापूर, दि. 19, मार्च - दक्षिण आणि उत्तरमधील सोसायट्यांवर आमचे प्राबल्य असून ही निवडणूक आम्हीच जिंकू,’ असा विश्‍वास दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच जिल्हाधिकारी दबावाखाली काम करीत आहेत. माजी आमदार दिलीप माने, स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे व दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे या त्रिकुटांनी ही निवडणूक जिंक ण्याचा चंग बांधला असून निवडणूक होणे अनिवार्य आहे, ती होणारच, असा विश्‍वासही हसापुरे यांनी व्यक्त केला. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला मुदतवाढ न देता, निवडणूक घ्यावी असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक वेळेवर होणार. आज कोणत्याही परिस्थितीत हरकतींवरची सुनावणी संपवावीच लागणार आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळणार नाही. पणन आयुक्त, पणन संचालक यांचे थेट आदेश आहेत की, उतार्‍यावरती जेवढी नावे आहेत, त्यांना वगळून एक क्रमांकावर जो शेतकरी असेल, त्याला मतदानाचा अधिक ार द्यावा, असे स्पष्टपणे सांगितले आहे. सुनावणीनंतर जे काही लोक न्यायालयात धाव घेतात, तो निकाल राखून निवडणूक होणार अशी शक्यता दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांनी व्यक्त केली आहे.