Breaking News

वीजेचा शॉक लागून आठ म्हशींचा मृत्यू

नाशिक, दि. 19, मार्च - नांदूर नाका पंचवटी परिसरात गोठ्यात बांधलेल्या आठ म्हशींना शॉक बसल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गोठ्यात शंभर पेक्षा अधिक म्हशी बांधलेल्या होत्या. सुदैवाने सुरुवातीच्या आठ म्हशींना शॉक बसल्यानंतर एका म्हशीची जागा रिक्त होती त्यामुळे इतर म्हशींना शॉक बसला नाही, दरम्यान, गोठेमालकाने महावितरणच्या गलथान कारभारामुळे हानी झाल्याचा आरोप केला आहे.


महावितरण कंपनीच्या वीजतारा गोठ्याच्या वरून गेल्या आहेत. अचानक वायर तुटल्यामुळे गोठ्यामध्ये वीजप्रवाह उतरला यात सुरुवातीच्या आठ म्हशींचा जागीच मृत्यू झाला. याच ठिकाणी काही मजूर काम करत होते मात्र प्रसंगावधान राखल्यामुळे त्यांना कुठलीही इजा झाली नाही.50-50 म्हशींच्या दोन रांगा करण्यात आल्या होत्या. सुरुवातीच्या रांगेतील म्हशींना विजेचा जोरदार धक्का बसला मात्र मध्येच एक म्हशीची जागा रिक होती त्यामुळे पुढील म्हशींना इजा झाली नाही.औरंगाबाद रोडवरील पवन साहेबराव लोहट यांच्या मालकीच्या पवन दूध डेअरी याठिकाणी ही घटना घडली. दुभत्या म्हशी दगावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
दगावलेल्या एका म्हशीची किंमत जवळपास दीड लाखांच्या घरात आहे. असे एकूण 12 लाखांचे नुकसान या घटनेत झाले आहे.या घटनेची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर याठिकाणी पंचनामा करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच स्थानीक लोकप्रति निधींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.