Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षेतुन मुक्तता

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईचे पेपर फुटल्यानंतर फेरपरीक्षेच्या निर्णयामुळे देशभरात गोंधळ उडाला आहे. मात्र मंउळाने शुक्रवारी दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देत, दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू असून 15 दिवसांत फेरपरीक्षा घ्यायची अथवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगत फेरपरीक्षा झाल्यास ती फक्त दिल्ली आणि हरयाणामध्येच होईल आणि ती जुलैमध्ये घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख मंडळाने जाहीर केली आहे. मनुष्यबळ विक ास मंत्रालयाचे सचिव (शालेय शिक्षण) अनिल स्वरूप यांनी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा एकदा 25 एप्रिलला होणार असल्याचे सांगितले. दरम्यान, सीबीएसईच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. सीबीएसईच्या बारावीचा अर्थशास्त्र आणि दहावीच्या गणिताचा पेपर फुटला होता. पेपर फुटल्यामुळे मंडळाने फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली. तर विरोधकांनी सरकारला या प्रकरणी धारेवर धरलं. सरकार आपली चूक झाकण्यासाठी फेरपरीक्षा घेत आहे अशी टीका काँग्रेसने केलीये.