Breaking News

डॉक्टरांचा प्रस्तावित संप मागे

मुंबई: डॉक्टरांनी 2 एप्रिलला पुकारलेला देशव्यापी संप तात्पुरता मागे घेतला आहे. दोन एप्रिलला डॉक्टरांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक आहे, त्या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकावरुन डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. हे विधयक सरकारने राज्यसभेत मांडलं, पण त्यावर चर्चा होऊ शकली नाही. संसदीय समितीने सरकारला या विधेयकात काही बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यातील काही सरकारने मान्य केल्या. त्यानुसार केंद्रीय कॅबिनेटने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातून आयुर्वेदीक ब्रिजकोर्स वगळला, एमबीबीएस परिक्षात एक्झिट परिक्षा केली. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयावर देशभरातील डॉक्टर समाधानी नाहीत. डॉक्टरांनी या विधेयकात आणखी बदल सुचवले आहेत. या मागणीसाठी त्यांनी दोन एप्रिलला संपाचा इशारा दिला होता. मात्र आता तो तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
डॉक्टरांचं शिष्टमंडळ दोन एप्रिलला आरोग्यमंत्र्याची भेट घेणार आहे. त्यानंतर संपाबाबत निर्णय होईल.