Breaking News

होय, मी चुकलो ! अमित शाह यांची कबूली

म्हैसूर - भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी अखेर आपली चूक मान्य केली आहे. मला सिध्दरामय्या म्हणायचे होते. मात्र, चूकीने मी येडियुरप्पांचा उल्लेख केला असे अमित शाह यांनी म्हटले आहे. मात्र, कर्नाटकातील जनता अशी चूक करणार नसल्याचा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे. कर्नाटकात एका ठिकाणी बोलताना अमित शाह यांनी सिद्धरामय्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यावेळी अमित शाह यांनी अनवधानाने सिद्धरामय्या यांच्याऐवजी येडियुरप्पांना भ्रष्टाचारी म्हटले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शाह यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत. पक्षाने 2014 पासून सर्व निवडणुका गमावल्या आहेत. कर्नाटकात देखील भाजप विजय संपादन करेल असा विश्‍वास शाह यांनी व्यक्त केला. काँग्रेस सरकारच्या काळात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 24 कार्यकर्त्यांची कर्नाटकात हत्या करण्यात आली. मात्र, त्याविरोधात पो लिसांनी कोणती कारवाई केली नाही. भाजप सरकार सत्तेवर आल्यास मृत कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना न्याय देईल असे शाह म्हणाले.