Breaking News

माढा येथील शिक्षकांनी दिला संपाचा इशारा

सोलापूर -  माढा शहरात असलेल्या जिल्हा परिषद प्रशालेच्या शिक्षकांचे व कर्मचार्‍यांचे पगार पाच महिन्यापासून झाले नाहीत. पगार मिळण्याची वारंवार मागणी जिल्हा परिषदेकडे के ली तरीही काही मार्ग न निघाल्याने या कंटाळलेल्या शिक्षक व कर्मचार्‍यांनी दहा दिवसांत पगार न मिळाल्यास सामूहिक बेमुदत संपाचे हत्यार शिक्षकांनी उपासण्याचा इशारा, शिक्षण उपसंचालक पुणे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


जिल्हा परिषदेच्या प्रशालेत जवळपास एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणार्‍या 24 शिक्षकांचे आणि 8 शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे ऑक्टोबर महिन्यापासून पगार थक ले आहेत.यामुळे त्यांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण विभागाकडे खेटे मारून लेखी निवदेन देऊन सर्वजण थकले. परिणामी शिक्षक व कर्मचारी यांनी सामूहिक रजेवर जावून कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आता घेतला आहे. या आंदोलनाचे निवेदन शिक्षक कर्मचारी यांनी शिक्षण उपसंचालक,जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य क ार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यांना बुधवारी दिले, अशी माहिती शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी दिली. यावेळी प्रशालेचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.