सोलापूर - राज्यातील ग्रंथालयांना भरीव अनुदान व कर्मचार्यांना वेतनश्रेणीनुसार वेतन देण्याची मागणी अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे यांनी केली होती. अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी ग्रंथालयांना भरीव अनुदान व कर्मचार्यांना वेतनश्रेणीनुसार वेतन देण्याबाबत अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याचे आश्वासन दिले. ग्रंथालय कर्मचार्यांना वेतनश्रेणी शासकीय क र्मचार्यांप्रमाणे लागू करावी, नवीन मान्यता व वर्गवाढ प्रस्तावास मंजुरी द्यावी, कर्मचार्यांचे वेतन ऑनलाइन जमा करावे, अनुदानाच्या निकषामध्ये कोणताही बदल न करता दुप्पट वाढ करावी, सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेस शासकीय मान्यता मिळावी, कर्मचार्यांना सामुदायिक विमा उतरविण्याची कार्यवाही व्हावी, 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत तपासणी कार्यक्रम लावू नये, ग्रंथालय तपासणी अहवाल वेळीच मिळावेत, राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या अधिवेशनाचा प्रवास खर्च अनुदानपात्र असावा आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कुंडलिक मोरे, रवींद्र कामत, सुनील कुबल, रमेश सुतार, रिजवान शेख यांच्यासह ग्रंथालय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रंथालयांना भरीव अनुदान देणार- अर्थमंत्री
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:45
Rating: 5