हलक्या सरींनी वातावरण थंड
जिल्ह्याच्या विविध ठिकाणी आज {दि. १६} सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरण थंड झाले. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गव्हाची सोंगणी स्थगित ठेवली. वातावरणातील झालेल्या या अचानक बदलामुळे शेतकार्यांसह सर्वच धास्तावले आहेत. यामुळे सर्दी, खोकला असे आजार बळावण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दमा आणि सांधेदुखीने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणातील या बदलाचा खूपच त्रास होत आहे. या बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचविण्यासाठी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.