Breaking News

‘विखे पॉलिटेक्निक’चा प्रकल्प राज्यात प्रथम


मुंबई येथील महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यातील सर्व पॉलिटेक्निकच्या प्रकल्प निर्मितीची राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकचा प्रकल्प राज्यात अव्वल ठरला. यासाठी प्रथम क्रमांकाचे ७५ हजारांचे पारितोषिक व सन्मान चिन्ह प्राप्त झाले. दरम्यान, पेटंट सादर करण्यासाठी या प्रकल्पाची निवड झाली असल्याची माहिती पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. मनोज परजणे यांनी दिली. 

या प्रकल्पासाठी प्राचार्य एम. बी. परजणे, प्रा. राहुल नरवडे मेकॅनिकल विभागाचे सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. अनिकेत निकम, कुणाल भाटे, हर्षद भालेराव, वैभव काळे या विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार केला आहे. संस्थेचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वामुळे यासाठी सातत्याने प्रोत्साहन मिळत आहे. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, युवा नेतृत्व डॉ. सुजय विखे मार्गदर्शनामुळे संस्था सातत्याने प्रगती करीत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे महासंचालक व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, सहसचिव भारत घोगरे, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्राचार्य आणि शिक्षकांनी अभिनंदन केले.