Breaking News

जिल्हयात अवैद्य वाळुचे टिप्पर किती जीव घेणार?

बीड (प्रतिनिधी)- सर्वच्च न्यायालयाच्या आदेशाने पर्यावरणाच्या हानी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात वाळु उपश्यावर बंदी घातली आहे याची काटेकोर पणे अंमलबाजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असतांना काही ठिकाणी न्यायालयाच्या आदेशा आगेदार वाळुचा लिलाव घेण्यात आला असल्याने बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील हिवरा पात्रातुन बीड,जालना यांच्या संयुक्त पणाने वाळुचे टेंडर देण्यात आले आहे. ऑक्टेबर 2018 पयत्न 20 हजार 800 ब्रॉस वाळु उपसा करण्याचे टेंडर संबंधीत व्यक्तीला देण्यात आला आहे. परंतु नियामपेक्षा जास्त प्रमाणात वाळु उपसा होत असुन माजलगावची वाळु सोन्याच्या दराने विक्री होत आहे. ब्रॉस सहा हजार दराने वाळु माफीया वाळुची विक्री करत असतांना खनण आधिकारी अजित पाटील मात्र नॉटरिचेबल असतात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळुच्या गाड्यांनी सामान्या नागरीकांचा जिव घेतला असतांना प्रशासनावर याचा कोणताही प रिणाम होतांना दिसत नाही. वाळुच्या टिप्परने आणखींन किती बळी घ्यायाचे याची वाट प्रशासन पाहत आहे. 
मागच्या तीन महिण्यात वाळुच्या गाड्यांनी भरधाव वेगाने वाहन चालवत बळी घेण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्हयात माजलगाव येथुन हिवरा पात्रातुन वाळु उपश्याची परवानगी आहे. परंतु या ठिकाणाहुन नियम बाह्य वाळु उपसा होत आहे. या कडे माजलगाव उपविभागीय अधिकारी यांचे दुलर्क्ष असुन पोलीस यंत्रना हप्प्ते खाण्यास मग्न आहेत. बीड येथुन जिल्हयाचा कारोभार पाहणारे खंणन अधिकारी अजित पाटील नेहमिच दौर्यावर असतात. नेमके दौरे कुठे होतात याचाही पत्ता नसतो मात्र साहेब दौर्यावर आहेत असेच उत्तर मिळते. वाळु माफीयांनी जिल्हयात मोठी यंत्रणा कार्यरत ठेवलेली आहे. प्रशासकीय अधिकार्या पासुन महसुल, पोलीस यांना कानडोळा करण्यासाठी पॅकेज असल्याचे बोलले जात आहे. परंतु जिल्हयात वाळु पट्यात नेहमीच वाळुच्या गाड्यानी आपघात होतात. या कडे साफ दुलर्क्ष केले जाते. अवैद्य पणे चालणार्या या धंद्या कडे सोन्याची कोंबडी म्हणुन पाहीले जाते, एका तालुक्याला परवानगी असतांना जिल्हयातील सर्वच वाळु पट्यात वाळुची तस्करी होतांना दिसत आहे. पोलीसांना चकवा देण्यासाठी गाड्या पळविल्या जातात याचा परिणाम सामान्यांचा जिव जाण्यास होतो. या कडे मात्र गंभीरतेने पाहीले जात नाही. पाटील साहेब आनखींन किती वाळुचे टिप्पर जीव घेणार असा प्रश्‍न सामान्यांतून उपस्थित केला जात आहे.