सातारा लोकसभा मतदार संघातील पराभूत उमेदवार यंदाच्या निवडणूकीत गायब होण्याची शक्यता
सातारा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. यामध्ये गतवर्षी लोकसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात असलेले चर्चेतील उमेदवार आता लोकांच्या संपर्कातून दूर जावू लागले आहेत तर काहीजणांपुढे त्यांच्याकडून झालेल्या काही अघटीत घटनांमुळे राजकीय क्षेत्रातून स्वत:हून दूर झाले तर काहीजण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर करून बाजूला होवू लागले आहेत. अशी काय जादू झाली की लोकसभेची निवडणूक लढविल्यानंतर अपयश आले तरीही पक्षात चांगले पद व स्थान असताना ते नेते राजकारणापासून दूर जावू लागले आहेत. तर काहीजणांचे राजकीय वलय नसल्यामुळे त्यांच्याबाबत कोठेही चर्चा होत नाही.
गत लोकसभेच्या निवडणूकीत विविध पक्षाचे उमेदवार रिंगणात उभे होते. त्यापैकी अपक्ष उमेदवार अॅड. वर्षा माडगुळकर यांनी सुरु केलेल्या जिजामाता सहकारी बँकेतील अपहारप्रक रणानंतर त्यांना ठेवीदारांसह सरकारी अधिकार्यांचा ससेमिरा चूकविण्यासाठी त्यांना अलिप्त रहावे लागले. लोकसभेची निवडणूक लढविल्यानंतर त्या पुन्हा कधीही सामाजिक क ार्यक्रमात सक्रीय होवू शकल्या नाहीत.
आम आदमी पक्षाच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढविणारे राजेंद्र चोरगे हे गेल्या तीन वर्षात पुन्हा स्वत:चा व्यवसाय व स्वत:च्या शिक्षण संस्थेसह त्यांनी सुरु केलेल्या जुन्या संस्था उदाहरनार्थ बालाजी चारिटेबल ट्रस्टच्या कार्याला कोणताही काळीमा लागू नये म्हणून राजकीय विषयावर तसेच सातारा शहरातील रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधासाठी ते सक्रीय झालेले पहावयास मिळाले नाही. सहज जाता-येता भेट झाल्यास ते कोणत्या तरी कामाच्या व्यापात व्यस्त असल्याचे दिसून येते.
महायुतीचे उमेदवार अशोक गायकवाड हे लोकसभेची निवडणूक लढविल्यापासून आंदोलनात सक्रीय आहेत. मात्र, त्यांच्याजवळील आक्रमकता जरा कमी होवू लागली असल्याचे दिसून येत आहे. सध्या ते सातारा-वाई परिसरात सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी कोणत्याही बहुजण समाजातील लाभार्थ्याला लाभापासून वंचित ठेवल्यास एकदम आक्रमक होत असत. मात्र, आता त्यांची तोप थंडावली असल्यासारखे वाटू लागले आहे.
शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष लोकसभेची निवडणूक लढविताना ब्लॅक कमांडोसारखे सुरक्षा रक्षक प्रचारादरम्यान ठेवले होते. निवडणूक झाल्यानंतर ते मात्र, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीपासून दूरच राहत असल्याचे पहावयास मिळत आहेत.
नगरपालिका, विधानसभा व लोकसभा निवडणूकामध्ये आपली उमेदवारी जाहीर करून कोणत्याही प्रकारे प्रचार न करणारा उमेदवार म्हणून ओळख असलेले अभिजीत बिचूकले हे त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये विविध शासकीय कार्यालयात फिरतात. मात्र, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीच त्यांच्याकडे पाहताना नको ती झंझट मागे लागेल, असे म्हणून त्यांना टाळत असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून न्यायालयीन कोठडीतून अपक्ष म्हणून संदीप मोझर यांनी उमेदवारी लढविली होती. त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यातून त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली होती. त्याप्रमाणे नुकताच त्यांनी एक जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करून आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी त्यांनी आपण राजकीय क्षेत्रातून बाजूला होत असल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर करून टाकले. नेमके काय झाले? याबाबत मात्र, त्यांनी कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यात मनसेला मिळालेला ताकदवान व धडाडीचा उमेदवार राजकीय क्षेत्रातून बाहेर पडल्याची सल लोकांच्या मनात आहे.