शहरात विविध ठिकाणी रंगपंचमी उत्साहात साजरी
रंगपंचमीनिमित्त राहुरी शहरात विविध ठिकाणी बालगोपालांसह तरुणाईने एकमेकांवर रंगाची उधळण करत रंगपंचमीचा आनंद लूटला. तर काही जणांनी नैसर्गिक रंगाने रंगपंचमी खेळून एक प्रकारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र शहरात पहावयास मिळाले.
होळीनंतर येणार्या या रंगपंचमीच्या सणाला फार महत्व आहे. प्रत्येक रंगाला अर्थ असतो, प्रत्येक रंगाची शिकवण असते. पांढरा रंग शांततेचा, लाल रंग त्यागाचा तर हिरवा रंग समृद्धीचा, रंगामुळे आपले जीवन देखील रंगीन होते. रंगपंचमीचा सण, त्यातले रंग हे आपल्याला बरच काही सांगून व शिकवून जातात. त्या रंगांनी आपण आपलं जीवनचित्र रंगवून घ्यायचं असतं. रंगाची दुनिया जिवनाला जगण्याचा एक नवा अर्थ देते. अशा या महत्वपूर्ण असलेल्या रंगपंचमीच्या दिवशी शहरात सकाळपासूनच एकमेकांना रंग लावण्याची चढाओढ लागली होती. काही भागात पिंप व कढाया रंगाने भरुन ठेवल्या होत्या. येणार्या प्रत्येक व्यक्तीला रंगामध्ये बुडवून आनंद लुटण्यात आला. तर काही ठिकाणी डिजे लावून संगिताच्या तालावर नाच करण्यात आला. दुपार नंतर शहरातील व्यापार्यांनी आपली दुकाने बंद करुन रंगपंचमीचा आनंद लुटला, तर महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी देखील एकमेकींना रंग लावून सप्तरंगांची आकाशात उधळण केली. यावेळी सर्व समाजातील लोकांनी जातीभेद विसरून मनसोक्त रंग उधळला. आपण प्रत्येकानेच आपले आवडते छंद, कला, नैपुण्य आदी अप्रतिम रंग भरुन आपलं जीवन हे रंगीन बनवायला हवं हाच रंगपंचमी या सणामागचा उद्देश आहे.