Breaking News

भैरवनाथ यात्रोत्सवाला प्रारंभ

करंजी प्रतिनिधी :पाथर्डी तालूक्यातील लोहसर (खांडगाव ) येथील श्रीकाळ भैरवनाथ देवस्थानच्या यात्रोत्सवास शनिवार दि 31 मार्च पासुन प्रारंभ होत असून नाथ महाराजांना तेल लावण्याच्या विधीपासूनच खरी यात्रेची लगबग सुरू होते .परिसरातील अनेक तरूण गंगेचे जल आणण्यासाठी कावड घेऊन कायगाव टोकाकडे मार्गस्थ झालेले आहेत .

दि. 31 मार्च ते 1 एप्रिल असा दोन दिवसांचा मुख्य यात्रोत्सव होत आहे. यावर्षी सलग सुट्टीचा काळ आल्याने यात्रेला चांगली गर्दी होणार अशी शक्यता आहे. चैत्र शु.पौर्णिमा दि.31 रोजी पहाटे 5 ते 7 या वेळेत ग्रामपुरोहित वेदमूर्ती लक्ष्मीकांत जोशी हे श्रीकाळ भैरवनाथ व जोगेश्‍वरी मातेला मंगलस्नान व महाआरती करतील नंतर गावात हनुमान जन्मोत्सव व सकाळी नऊ वाजता कावडी मिरवणूक होईल. देवस्थानला धार्मिक,सामाजिक,पारंपरिक कार्याचा वारसा असल्यामुळे त्यामध्ये कावडीचे पाणी घालण्याचा मान श्रीक्षेत्र बक्तरपुर ता. शेवंगाव या गावाला अनंत काळापासून आहे. यात्रोत्सवाच्या काळात भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात.त्यामध्ये देवस्थानचे वैशिष्ट्य आहे की इथे नारळ,पान-फुले,हार,यांना मंदिरात मनाई आहे, आणि त्या बाबतीत स्वच्छता ठेवली 

जाते.शनिवारी दुपारी 3 ते 6 शेरणी वाटप व नवसपूर्ती, आणि ठीक 6 वाजता मानाचे ग्रामस्थ श्री गेनाजी गीते आणि परिवार यांच्या घरापासून छबिना मिरवणुकीला प्रारंभ होईल. त्यानंतर आकर्षक फटाकेची आतशबाजी होणार आहे . यात्रोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी सहा वाजता कावडीचे गंगा स्नानाने श्रींना महाभिषेक,महापूजा नंतर कलाकाराच्या हजेर्‍या व दुपारी बारा वाजता 101 कुटुंबाच्या हस्ते महाआरती व महासोहळा संपन्न होईल. त्यानंतर काळभैरवनाथ कुस्ती स्टेडीयममध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्लांचा कुस्तीचा जाहीर हंगामा होणार आहे त्यानंतर यात्रोत्सवाचा समारोप होईल. श्री काळ भैरवनाथ देवस्थानचा यात्रोत्सव हा सुमारे 100 गावांचा मिळून आहे. म्हणून यामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिरासमोर खेळणी,खाऊ-मिठाईच्या,अनेक प्रकारचे व्यवसायीक येथे आवर्जुन येतात .काळभैरवनाथ यात्रोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोहसरचे सरपंच व यात्रा कमिटीचे प्रमुख अनिल गिते , उपसरपंच डॉ गोरक्ष गिते , रावसाहेब वांढेकर , युवानेते राजेंद्र दगडखैर , पोलीस पाटील नामदेव वांढेकर , रविंद्र जोशी यांच्यासह लोहसर , पवळवाडी , खांडगाव , जोहारवाडी , डोंगरवाडी , भोसे ,राघोहीवरे, आठरे कौडगाव, देवराई येथील ग्रामस्थांनी केले आहे .