Breaking News

उपोषण मागे घेताच विविध ठिकाणी हर्षोल्हास


रामलिला मैदानावर सात दिवसांपासून सुरू असलेले अण्णा हजारेंचे उपोषण मागे घेतल्याचे समजताच शहरासह ग्रामीण भागांमध्येही हर्षोल्हास साजरा करण्यात आला. अनेक गावांमध्ये अण्णांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आंदोलन सुरू केले होते. त्या गावांमधील उपोषण देखील कार्यकर्त्यांनी, शेतकर्‍यांनी मागे घेतले. विविध गावांमध्ये शेतकर्‍यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. अण्णांच्या गावामध्येही सवाद्य हर्षोल्हास साजरा करण्यात आला.