Breaking News

राक्षसवाडीच्या सरपंचपदी रावसाहेब काळे बिनविरोध

कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी खुर्द ग्रामपंचायतीवर धनराज कोपनर गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. सरपंच पदासाठी एकच अर्ज आल्याने रावसाहेब काळे यांची बिनविरोध निवड झाली. अविश्‍वास ठरावाने येथील सरपंचपद रिक्त होते. संजय गांधी निराधार योजनेचे कर्जत तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य धनराज कोपनर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडीत रावसाहेब काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. एम. डहाळे यांनी काम पाहिले.


नवनिर्वाचित सरपंच रावसाहेब काळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.गावाच्या विकासाचे शिल्पकार धनराज कोपनर, देविदास कोपनर, रामदास कारंडे, सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन विजय पावणे, बाळासाहेब जानकू काळे, अनिल देवकाते, भानुदास कोपनर, धोंडीबा कोपनर आदींनी एकत्र येवून रावसाहेब काळे यांची सरपंचपदावर वर्णी लावली.
उपसरपंच संगिता कारंडे, दादा कारंडे, जयसिंग कोरडकर, नामदेव कोरडकर, युवा नेते प्रमोद पावणे, विठ्ठल पिंगळे, अंकुश कोपनर, लाला कोपनर, नामदेव रुपनर, गणेश कोरडकर, जयसिंग देवकाते, शिवाजी कारंडे, संभाजी म्हस्के, संभाजी कारंडे आदी कार्यकर्त्यांनी राक्षसवाडी खुर्द येथे गुलालाची उधळत करत फटाके फोडून जल्लोष केला. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला होता.धनराज कोपनर, नवनिर्वाचित सरपंच रावसाहेब काळे यांची गावात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर राक्षाई देवी मंदिरात विजयी सभा घेण्यात आली. राक्षसवाडी ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करुन गावाला लौकिक प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही धनराज कोपनर यांनी यावेळी बोलताना दिली.नवनिर्वाचित सरपंच काळे यांचे सर्वत्र अभिनंदन केले.