जामखेड शहरातील एटीएममध्ये खडखडाट; नागरिकांची कुचंबणा शहरातील 10 एटीएम रिकामेच !
एटीएम मशीनमधून पैसे मिळणे म्हणजे नशिबच अशी उद्विग्न प्रतिक्रीया जामखेड शहरासह तालुक्यातील नागरिक, शेतकरी व ग्राहक देत आहेत़ या व्यथा बँक प्रशासनाकडे मांडल्यानंतरही या गैरसोयीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा होत असल्याचा आरोप नागरिकामधून होत आहे़ जामखेड शहरातील जवळपास सर्व एटीएम मशीन आज बंद आहेत.
जिल्हा बँक डबघाईला आल्यामुळे शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांनीही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते काढून व्यवहार करण्यावर भर दिला आहे़ राष्ट्रीयकृत बँकांची शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शाखांमध्ये अपुर्या कर्मचार्यांमुळे अनेकवेळा ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो़ राष्ट्रीयकृत बँकेत खाते असेल तर गाव, शहर सोडून इतरत्रही पैैशांचा व्यवहार करता येतो़ विशेषत: रोकड घेऊन फिरण्याऐवजी एटीएम मशीनद्वारे पैैसे काढता येत असल्याने अनेकांनी या राष्ट्रीयकृत बँकांमधून व्यवहार सुरू केले आहेत़ मात्र, राष्ट्रीयकृत बँकांची एटीएम सेवा पूर्णत: विस्कळीत झाल्याने रोजच तास-तास रांगेत थांबून ग्राहकांना पैैसे काढावे लागतात़ एका ठिकाणी दोन एटीएम मशीन असतील तर त्यातील एकाच मशीनद्वारे पैैसे काढता येतात़ तर अनेक एटीएम मशीनमध्ये दिवसाही पैसे नसतात. आता तर सलग सुट्ट्यामुळे गाहकांना आता प्रंचड मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
जामखेड शहरात विविध राष्ट्रीयकृत बँकांचे जवळपास 10 एटीएम मशीन आहेत़ शहरातील बीड रोड, तहसील कार्यालय परिसर, बसस्थानक परिसरात जवळपास चार एटीएम मशीन आहेत़ परंतू एटीएम मशीनमध्ये पैैसेच नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
विशेषत: ग्रामीण भागात असणार्या शेतकर्यांना पिक कर्ज भरण्यासाठी 31 मार्च शेवटची मुदत असते. पंरतू एटीएममध्ये खडखडाट असल्याने शेतकरी हा कर्ज भरू शकत नाही. याला या संकटाचा सामना करावा लागत आहे.
एटीएम मशीनमधील पैैसे संपले तर ते आठ-आठ दिवस भरण्यात येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत़ शहरी, ग्रामीण भागातील नागरिकांनी बँक प्रशासनाकडे तक्रारी केल्या तरी त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही़ विशेषत: रोकड भरणार्या एजन्सीलाही जाब विचारण्याचे औदार्य बँक प्रशासन दाखवित नाही़ ग्राहकांना देण्यात येणार्या विविध सेवांसाठी कर लावण्यात येतो़ मात्र, तरीही सुरळीत सेवा मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे़