Breaking News

14 नं चारी लाभार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना


तालुक्यामध्ये सध्या कुकडीचे आवर्तन सुरु आहे. 14 नंबर चारी तालुक्याच्या टेल असून दर रोटेशनला या चारीला पाणी सोडताना अन्याय होतो. कित्येकवेळा आंदोलनही करण्यात आले. परंतू पाणी मिळाले नाही. धरणामध्ये आजमितीस मुबलक पाणी साठा आहे. सुरू असणारे आवर्तन फळ बागेसह उभे असलेल्या पिकांना संजवनी ठरणार आहे. अधिकारी चिरीमिरी देईल त्याला पाणी अशी भूमिका घेत असल्याने सर्वसामान्य शेतकरी अडचणीत सापडला आहे. 14. नंबर चारीला चिरीमिरी न दिल्याने संबंधित आधिकार्‍याने तातडीने पाणी बंद करुन सर्व पाणी मोठी तडजोड करत घोडेगाव तलावात सोडले. आज श्रीगोंदा येथील कार्यालयात नाराज झालेले शेतकरी ये-जा करत असताना दिसत आहेत. आपले म्हणने कार्यकारी अंभियंता सु. ना. कोळी याना सांगत होते. योग्य तो निर्णय घेवून पाणी सोडण्याचे आश्‍वासन त्यांनी दिल्याचे समजते.