Breaking News

सेवापूर्ती सोहळा हा शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव - जंगले


चांदा,आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर विद्यालयात होणारा सेवापूर्ती सोहळा हा शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव आहे. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सदस्या अलकाताई जंगले यांनी जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा येथील भूगोल विषयाचे प्रा.गोरक्षनाथ आसाराम गव्हाणे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावरून बोलताना केले.

प्रा. गव्हाणे हे प्रामाणिक, संयमी व कर्तव्यदक्ष शिक्षक आहेत असा गुणगौरव प्राचार्य चंद्रकांत दरंदले यांनी प्रास्ताविकातून केला. गव्हाणे वक्तशीरपणा जपणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत असे गौरवोद्गार प्रा.अशोक चौधरी यांनी काढले. प्रा.गोरक्ष गव्हाणे कर्तव्यनिष्ठ शिक्षक असून विद्यार्थी हा केंद्रबिंदु मानुन प्रामाणिकपणे आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले अशा शब्दांत जिल्हा मराठा संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. दिपक शिंदे यांनी सन्मान केला तर प्रा.गव्हाणे संयमी,चारित्र्यसंपन्न व अष्टपैलू शिक्षक असून त्यांनी प्रामाणिकपणे आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले अशा शब्दांत ज्ञानेश्‍वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.अशोकराव शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन गुणगान केले.

याप्रसंगी प्रा.भगवान भाबड, न्यू आर्ट्स कॉलेज शेवगाव चे उपप्राचार्य एल. एच. देशमुख, प्रा.पाठक , माजी प्राचार्य भागीरथी शिंदे, उप प्राचार्य नारायण ढवळे, पर्यवेक्षिका अलका शेरकर, सरपंच सुवर्णलता अभिनव, माजी सभापती कारभारी जावळे, शामराव पवार, श्रीमती कस्तुरी राशीनकर, आप्पाहरी दहातोंडे, बंडू दहातोंडे, सादिक भाई शेख, देविदास पासलकर, शहाजी धुमाळ, पोलीस पाटील कैलास अभिनव, जगन्नाथ भगत, प्राचार्य उद्धवराव सोनवणे, प्राचार्य कर्डीले, सुनील दानवे, बाळासाहेब जावळे यांसह सर्व मित्रपरिवार , नातेवाईक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य दरंदले, उपप्राचार्य ढवळे, पर्यवेक्षिका शेरकर, प्रा.संदीप शेंडगे, प्रा.भाऊसाहेब तांबे, प्रा.भगवान भाबड, प्रा.रावसाहेब राशीनकर प्रा.कृष्णा शेंडे, प्रा.नितीन भालके, प्रा.संदीप कासार, प्रा. अशोक जाधव, प्रा.दत्तात्रय हराळ, प्रा.श्रीमती नवल,प्रा.श्रीमती रहाणे, प्रा.कु.गादेकर व विद्यालयातील सर्वच सेवक वृंदाचे विशेष सहकार्य लाभले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली व उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भाऊसाहेब तांबे व प्रा.कृष्णा शेंडे यांनी केले व जनार्दन पटारे यांनी आभार मानले.