Breaking News

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ

मुंबई : एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनलने प्रवाशांना मिळणार्‍या अनुभवाच्या बाबतीत, जीव्हीके ॠएमआयएएल’तर्फे चालवल्या व व्यवस्थापन केल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला (सीएसआयए) एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी (एएसक्यू) अवॉर्ड्स 2017 साठी जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवडले असल्याचे एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनलने बुधवारी जाहीर केले.
176 देशांतील 1953 सदस्य विमानतळ असलेल्या एसीआय व्यापार संघटनेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये लाखो प्रवाशांनी निवड केल्याने या पुरस्काराने प्रवाशांच्या गरजांशी संबंधित सेवेच्या निकषांच्या पूर्ततेविषयी मुंबई विमानतळाची उत्कृष्ट कामगिरी अधोरेखित केली आहे. एसीआयच्या जागतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून, विमानतळ सुविधा, चेक- इन, सिक्युरिटी स्क्रीनिंग, रेस्टरूम्स, दुकाने व रेस्तराँ यांसह 34 प्रमुख निकषांच्या आधारे प्रतिसाद घेण्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले. विमान वाहतूक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा सन्मान मिळणे म्हणजे कार्यक्षमता, सुरक्षितता व विश्‍वासार्हता यांचे आश्‍वासन देणार्‍या जीव्हीके एमआयएएलच्या कार्यपद्धतीला मिळालेली पोचपावती आहे. या विमानतळावर येणार्‍या सर्व प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव मिळावा, यासाठी कंपनी करत असलेल्या प्रयत्नांची दखल या पुरस्काराने घेतली आहे.

यानिमित्त बोलताना, जीव्हीकेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. जीव्हीके रेड्डी यांनी सांगितले, हा पुरस्कार मिळाल्याचा आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. 2007 मध्ये जेव्हा आम्ही या विमानतळाच्या कार्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली तेव्हा एएसक्यू स्कोअर 3.53 होता आणि त्यानंतर 10 वर्षांत आम्ही तो जास्तीत जास्त 5 पैकी 4.99 इतक ा केला आहे. सीआयएसएफ, कस्टम्स, इमिग्रेशन टीम्स, विमानकंपनीचा कर्मचारीवर्ग, एफअँडबी व रिटेल टीम्स, हाउसकीपिंग व देखभाल युनिट यांचा समावेश असलेले विमानतळावरील तीस हजार सदस्य आणि दर्जा उंचावण्यासाठी व नवनवी प्रमाणके निर्माण करण्यासाठी विमानतळावर सातत्याने कार्यरत असलेले आमचे कर्मचारी यांनी 2017 या वर्षात अंदाजे 46 दशलक्ष प्रवाशांना दिलेल्या दर्जेदार सेवेमुळे हा गौरव प्राप्त झाला आहे.
भविष्यात, प्रवाशांना आनंद देण्यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करणार आहोत व नावीन्यपूर्ण सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत, असे डॉ. रेड्डी यांनी सां गितले. जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळांमध्ये सीएसआयएचा समावेश व्हावा, या हेतूने जीव्हीके एमआयएएलने सातत्याने प्रयत्न केले आहेत. सेवा, कार्यपद्धतीव कार्यप्रणाली या बाबतीत सीएसआयएच्या माध्यमातून साध्य करण्यात आलेल्या बदलांमुळे सर्व प्रवाशांना प्रवासाशी संबंधित उत्कृष्ट सेवा उपलब्ध झाल्या आहेत. प्रवाशांना जीव्हीके जया हे न्यू म्यु झिअम यासह जागतिक दर्जाच्या विविध सुविधा देऊन सीएसआयएने मुंबईपासूनचा किंवा मुंबईपर्यंतचा प्रवास अतिशय सुखद व अविस्मरणीय केला आहे.