सरकारकडून लोकशाहीचा खून : वळसे पाटील
विधानसभा अध्यक्षांना आपल्या पदावर कायम ठेवण्यासाठी सरकारने विश्वासदर्शक ठराव आज आवाजी मतदानाने मंजूर केला. विरोधकांना गाफील ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष बागडे यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर विरोधकांनी सभागृहात गदारोळाला सुरुवात केली. त्यावेळी सभागृहाचे कामकाज हे नियमानुसारच झाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी स्पष्ट केले. तर विरोधकांना प्रस्ताव मांडण्यास तालिका अध्यक्षांनी नकार दिला. त्यामुळे या सरकारने लोकशाहीचा खून केला असल्याची प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिली.