Breaking News

शेतकर्‍यांचा ‘मुंबई जाम’चा इशारा


मुंबई : शेतकर्‍यांना कर्जमुक्ती मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी अशा अनेक मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी लाँग मोर्चा काढला आहे. नाशिक पासून निघालेला हा मोर्चा शनिवारी भिवंडीत धडकला आहे. शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न केल्यास 30 हजार मोर्चेकरी शेतकरी संपूर्ण मुंबई जाम करतील, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांनी दिला आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, 10 ते 15 टक्केसुध्दा कर्जमाफी झाली नाही. कसेल त्याच्या नावावर वन जमीन करणे, या 2006 च्या पारित कायद्याची गेल्या 12 वर्षांत अंमलबजावणी झालेली नाही. राज्यात कर्जबाजारीपणामुळे सुमारे 75 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या मागण्या व प्रश्‍नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने हा लाँग मार्च नाशिक ते विधानभवनापर्यत पायी काढण्यात आला आहे. सुमारे 30 हजारांहून अधिक शेतकरी या मोर्चात सामील झाले आहेत. नदीजोड प्रकल्पाचा प्रश्‍न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, रेशनकार्डचे नूतनीक रण, इंधन किमतीवर नियंत्रण ठेवणे आदी विषयाबात शेतकर्‍यांनी या मोर्चातून मागण्या केल्या आहेत. 
दरम्यान या मोर्चात सुरगाणा तालुक्यातील शेतकरी लालबाबट्याखाली सहभागी झाले आहेत. डोक्यावर लाल टोपी, हातात लाल झेंडे, खिशाला पक्षाचे बॅच लावून शेतक री आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. लाँग मार्चच्या पाचव्या दिवशी भिवंडी तालुक्यातील वळकस गावात मोर्चेकरी शेतकर्‍यांनी मुक्काम केला. पहाटेच्या सुमाराला वि हिरीवर, नदीवर अंघोळी करून मोर्चेकरी पुढे मार्गस्थ झाले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील शेतकरीही भिवंडी बायपासपासून मोर्चात सहभागी झाले. लाँग मार्चचे हे लाल वादळ सोमवारी विधान भवनावर जावून धडकणार असल्याची माहिती लाँग मार्चच्या आयोजकांनी दिली.