Breaking News

तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले


मुरूड : मुरूडजवळच्या नांदगाव बंदर येथे भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत महिला वैमानिकासह तिघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर मुंबईकडून श्रीवर्धनच्या दिशेने जात असतांना, नांदगावच्या खडकाळ भागात हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये तीन पुरूष व एक महिला वैमानिक होती. अपघातामध्ये महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून इतर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती तेथिल अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक संजय पाटील यांनी दिली. या घडनेनंतर मुरू डचे पोलीस निरीक्षक आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय तटरक्षक दलाचे विशेष पथकही त्या ठिकाणी दाखल झाले. यानंतर अपघातग्रस्तांना हेलिकॉप्टरने मुंबईतील नौदलाच्या रूग्नालयात नेण्यात आले. अद्यापही या अपघाताचे कारण समजू शकले नाही.