दिव्यांगांसाठी स्वावलंबन कार्डचे वाटप
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी शासकीय योजनांचा मार्गदर्शन मेळावा आज {दि. २५} मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भाजपाचे प्रांतिक सदस्य विधीज्ञ रविंद्र बोरावके, उपनगराध्यक्ष विजय वाजे, गटनेते रविंद्र पाठक, तालुकाध्यक्ष शरद थोरात, कैलास खैरे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी दिव्यांग बांधवांना स्वावलंबन कार्डचे वितरण करण्यात आले. अनेक दिव्यांगबांधवांनी या मेळाव्याचा लाभ घेतला.
प्रारंभी भाजपाचे दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकूंद काळे यांनी प्रास्तविक केले. शहराध्यक्ष मुख्तार पठाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यशोधन मल्टीप्लेक्सचे संचालक चेतन बागले यांनी दिव्यांग शिष्यवृत्ती भाडयात सवलत, किमान कौशल्य प्रशिक्षण आदी शासकीय योजनांची माहिती दिली. याप्रसंगी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, जितेंद्र रणशूर, नगरसेवक शिवाजी कांडेकर, स्वप्निल निखाडे, रविंद्र रोहमारे, विवेक सोनवणे, माजी संचालक बाळासाहेब नरोडे, व्यापारी नारायण अग्रवाल, भाजपाचे माजी शहराध्यक्ष महावीर दगडे, अजिनाथ ढाकणे, दिनेश कांबळे, वैभव गिरमे, रिपाइंचे शहराध्यक्ष भोलानाथ पगारे, करंजीचे उपसरपंच रविंद्र आगवण, सतिष रानोडे, अकबर शेख, फकिर महंमद पहिलवान, अयूब मास्टर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक जयवंत मरसाळे, पंडीत पंडोरे, एस. आर. पवार, पी. एच. वाणी यांनी विषेश परिश्रम घेतले. शहराध्यक्ष कैलास खैरे यांनी आभार मानले.