Breaking News

गुढीपाडवा संमिश्र स्वरूपात साजरा

गुढीपाडव्याविषयी अनेक दंतकथा आपण एैकलेल्या आहेत. त्यामध्ये, राम विजयी होऊन लंकेहून अयोध्येला परत आले, म्हणून बांबूच्या टोकावर पालथा तांब्या ठेवून साडी गाठी आणि लिंबाचा पाला वापरत असल्याची प्रथा आजही सुरू आहे. परतू महाराष्ट्र सोडला तर इतर ठिकाणी का नाही असा पश्‍न अनेकांनी उपस्थित केल्याने काही नागरिकांनी संभाजी राजेंचे हाल करुन, बांबूच्या टोकावर शिर मिरवले. आपलेकडे पालथी चप्पल पालथा ताब्या अशुभ लक्षण मानले जाते. असे सांगत गुढीपाडव्याच्या दिवशी हिरडगाव ग्रामस्तांनी एकत्रीत येत नवीन पंरपरा सुरू केली. याठिकाणी गुढी ऐवजी भगव्या पताका, त्यावर छत्रपतींचा फोटो गुढीपाडव्याच्या दिवशी गावभर झळकताना दिसत होते. तरुणाई एकवटल्याने नवीन प्रथा सुरु झाली. येथून पुढे पाडव्यानिमित्त अशीच प्रथा सुरू राहणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संपतराव दरेकर यांनी दिली.