Breaking News

पारनेर तालुका अध्यक्ष निवड बैठकीला पवार, उचाळे, नगरे गैरहजर

पारनेर/ प्रतिनिधी /- काही केल्या पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद मात्र मिटता मिटेना. यामुळे आगामी निवडणुकीत घड्याळाचे काटे फिरतील काय ? असा प्रश्न सर्व सामन्यांपुढे पडला आहे. राष्ट्रवादीच्या पारनेर तालुका अध्यक्ष निवडीच्या बैठकीला निरोप पाठवुनही पंचायत समिती उपभापती दिपक पवार, माजी जि. प. सदस्य मधुकर उचाळे, माजी पं स. सदस्य शंकर नगरे हे गैरहजर राहील्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद समोर आला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीच्या प्रक्रीयेला अनुपस्थित राहुन वरील नेत्यांनी नाराजी दाखवल्याने ही नाराजी दुर करण्यासाठी पक्षनेतृत्व काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

पारनेर तालुक्यातील पक्षवाढीसाठी व तालुकाध्यक्ष पदाचे इच्छुकांचे अर्ज मागविण्यासाठी काल बाजार समितीच्या सभागृहात कार्यकर्त्याची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत तालुकाध्यक्ष पदासाठी विद्यमान तालुकाध्यक्ष दादा पठारे, बंडखोर गटाचे अशोक सावंत व सोमनाथ वरखडे, सबाजी गायकवाड, प्रशांत गायकवाड, गंगाराम बेलकर, अरुण ठाणगे, यांनी पक्ष निरिक्षकांकडे अर्ज सादर केले आहेत. कै. आम. वसंतराव झावरे यांच्या स्मृतीदिनाला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येउन गेले. त्यावेळेस असे वाटले की पक्षात आता काही धुसपुस होउ शकणार नाही. पण काही दिवसातच परिस्थिती जैसे थे दिसुन आली आहे. त्यातच भर पडली ती मा.जि.प.सदस्य मधुकर उचाळे आणि मा. पं. स. सदस्य शंकर नगरे यांच्या अऩुपस्थिने पक्षात काही अलबेल नसल्याचे चिञ दिसत आहे. मा. जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या बरोबर सावली सारखे असणारे नगरे हे काही दिवसा पासुन लांबच आहेत. ते पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमाला हजेरी लावत नाहीत. तसेच उचाळे, सावंत, पवार, वरखडे, नगरे, यांच्या मनात नक्की काय चाललय? या विषयी उत्सुकता वाटत आहे. दिनेश औटीच्या पाठोपाठ नगरे ही काही वेगळा निर्णय घेणार का.?काही दिवसातच अजुनही दोन मोठाले धक्के पक्षाला नेतृत्वामुळे सहन करावे लागेल असेच दिसुन येत आहे. येत्या काही दिवसात हे चिञ देखील स्पष्ट होईल असा जाणकारांचा अंदाज आहे.