Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीचे अधिकार घुले-ढाकणेंना'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी, आज बाजार समितीच्या सभागृहात बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत फारसी चर्चा न होता. पदाधिकारी निवडीचे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले व केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड.प्रताप ढाकणे यांना बहाल करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजवरच्या पक्षांतर्गत लोकशाहीला सर्रास हरताळ फासण्यात आला. माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांच्या अनुपस्थितीमुळे मात्र तर्कवितर्कांना उधाण आले.

निवडणूक निरीक्षक म्हणून ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, जेष्ठ नेते चंद्रकांत म्हस्के, पाथर्डी बाजार समितीचे सभापती बन्सी आठरे, माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ, उपसभापती विष्णूपंत सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, जिल्हा सरचिटणीस बंडू पाटील बोरुडे, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, चाँद मणियार, युवानेते अमोल वाघ, महिला तालुकाध्यक्ष मनिषा डांभे, माजी नगरसेविका आरती निऱ्हाळी, योगेश रासने, उमेश चोभे, बंडू अकोलकर, योगेश वाळके, ज्ञानेश्वर सातपुते, चैतन्य मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष, मनिषा डांभे यांनी आज तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. कुठल्याही लाभाची अपेक्षा न धरता आजवर त्यांनी त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त योगदान दिले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत, तालुक्याची कार्यकारिणी निर्माण करण्याबरोबरच पक्षाला जनतेत नेण्याचे मोठे काम मनिषा डांभे यांनी केले. परंतु स्थानिक पातळीवरील हेव्यादाव्यांत स्वारस्य दाखवताना काम करणाऱ्यांपेक्षा जनाधार नसलेल्यांना पक्षश्रेष्ठी महत्व देत असल्याने त्या अस्वस्थ झाल्या होत्या. धडाडीच्या नेत्या म्हणून त्या अल्पावधीत प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या तोलामोलाची महिला पदाधिकारी मिळवणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी अवघड जाणार आहे. त्यांना त्यांची व्यथा मांडू न दिल्याने त्या नाराज झाल्या असल्याचे मानले जाते.