पाकच्या गोळीबारात 5 भारतीयांचा मृत्यू
पुंछ : पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ भागात पुन्हा एकदा श्स्त्रसंधीचे उलंघण केले आहे. त्यांनी बालाकोट सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. यात भारताच्या पाच नागरिकांचा मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुंछच्या बालाकोट परिसरात नियंत्रण रेषेपलीकडून पा किस्तानने मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि शेलींग केले. यात पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असे जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वइद यांनी सांगितले. यपूर्वी, गेल्या आठवड्यात पाकिस्तानी सैनिकांनी राजोरीच्या सुंदरवनी भागात अंधाधूंद आणि स्वैर गोळीबार केला होता.