Breaking News

बंद पाईपलाईनच्या विरोधात निळवंडे पाटपाणी कृती समिती व शेतकऱ्यांचा मोर्चा.


निळवंडे लाभक्षेत्रातील १८२ गावांतील शेतकरी शिर्डी, राहाता व कोपरगाव या शहरांसाठी होऊ घातलेल्या बंद पाईपलाईनच्या विरोधात निळवंडे पाटपाणी कृती समिती व या क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांनी आज १९ मार्च रोजी निषेधार्थ मोर्चा काढत भव्य मोटारसायकल रँली तांभेरे गुहा परिसरातून काढण्यात आली रँली राहुरी चे नगराध्यक्ष तथा प्रसाद शुगरचे चेअरमन प्राजक्त तनपुरे यांचे अध्यक्षतेखाली निघाली प्राजक्त तनपुरे आंदोलकांसोबत मोटारसायकलवर स्वार होवून सहभागी झाले व आंदोलकांसह मोटारसायकलवर अहमदनगरकडे रखरखत्या ऊन्हात बळीराजाच्या न्यायमागणीसाठी निघाले या रँलीचे राहुरीत बाजारसमितीसमोर बाजार समितीचे चेअरमन अरूणसाहेब तनपुरे यांनी स्वागत करुन पाठिंबा दर्शविला तर अ.भा.छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे,संभाजी ब्रिगेडचे मच्छिंद्र गुंड,मराठा सेवा संघाचे राजेंद्र खोजे यांनीही पाठिंब्याचे पत्र देत स्वागत केले यानंतर आंदोलकांच्या रँलीने नगरकडे कुच केले 

कृती समितीच्या पुढाकारीतुन लाभक्षेत्रातील गावागावांत जनजागृती सभा घेऊन बंद पाईपलाईनचा डाव हाणुन पाडण्यासाठी शेतक-यांना एकत्र केले व सभा घेवून आवाहन करत सभांना वाढता प्रतिसाद पाहता शेवटच्या लढ्यासाठी शेतक-यांची ऐकी पाहवयास मिळली. उत्तर नगर जिल्ह्यातील सुमारे १८२ गावांना समृद्धीस नेणारे निळवंडे धरण गेल्या दोन वर्षापासुन पुर्ण क्षमतेने भरत आहेत, परंतू कालव्याची कामे अधुरी असल्याने शेतात पाणि पोहचु शकले नाही, त्यामुळे आपला संसार चालवण्यासाठी या शेतक-यांना मोलमजुरीशिवाय पर्याय नाही . ज्या लाभक्षेत्रासाठी धरणाची निर्मीती केली, आणि तेथील शेतक-यांना जर पाणि मिळत नसेल तर ८ .३२ टी एम सी पाणि अडविण्याचे कारण काय ? जर निळवंडेचे पाणि शेतक-यांना मिळाले तर येथिल जनता स्वयंपुर्ण होईल, त्यामुळे राजकारण्याना येथिल जनतेला झुलवता येणार नाही व निळवंडे धरणातुन काही राजकारण्यांना पाहिजे तेव्हा पाणि वापरता येणार नसल्यामुळे मोठ्या शहरांना हे पाणि पळवण्याच षडयंत्र चालु आहे .
त्यामुळे आजच्या १९ तारखेला होणा-या शेवटच्या लढाईत सर्व शेतक-यांनी सामिल व्हावे असे आवाहन कृती समितीने प्रसिद्धी पत्रकातुन केले होते त्यास मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले आंदोलान रँलीत कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, उपाध्यक्ष रमेश दिघे, कार्य़ाध्यक्ष गंगाधर गमे, संस्थापक, नानासाहेब शेळके, सचिव उत्तम घोरपडे, सहसचिव राजेंद्र सोनवणे, चंद्रभान गुंजाळ, दत्ता भालेराव, रविंद्र वर्पे, सोमनाथ दरंदले, सुखलाल गांगवे, दादासाहेब पवार या समिती पदाधिका-यासह मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या सहभाग दिसून आला .

साईबाबांना पाणि देण्यास विरोध नाही .
संपुर्ण दक्षिण भारताची तहान भागवणारी गोदावरी नदी कोपरगाव , शिर्डी व राहाता या शहरांची तहाण भागवु शकत नाही का ? दारणा धरनातुन कोपरगावसाठी २१० दसलक्ष घनफुट, शिर्डीसाठी १०१ घनफुट पिण्याचे पाणि आरक्षित असुन राहाता शहरालाही याच धरणाचे पाणि आरक्षित आहे . निळवंडेच्या पाण्यासाठी लाभधारक शेतक-यांनी लाठ्या काठ्या झेलल्या, जेलची हवा खाली तसेच अजुनही कृती समितीच्या कार्यकर्त्यावर केसेस चालु आहे . वेळोवेळी निळवंडेसाठी आंदोलने केली, शासनदरबारी पाठपुरावा केला . त्यामुळे ४८ वर्षाचा संघर्ष वाया जावू देणार नाही . शिर्डीला पाणि देण्यास आमचा विरोध नाही, असे कृती समितीने स्पष्ट केले . शिर्डीपासुन निळवंडेचे लाभक्षेत्र २ किमी च्या अंतरावर आहे. शिर्डीला पाण्याची टंचाई भासल्यास शिर्डी शहराजवळील निळवंडेच्या लाभक्षेत्रातील कोणत्याही गावात साठवन तलाव घेऊन तेथुन पाणि उपसावे व पिण्याचे पाणि वापरावे, जर शिर्डी, राहाता व कोपरगाव या शहरांना बंद पाईपलाईनने पाणि मिळाले तर पोहेगावच्या खाली शिर्डी, राहाता व कोपरगावच्या शेतक-यांना उन्हाळ्यात पिण्याच्या नावाखाली शेतीला वापरले जाणारे रोटेशन बंद होण्याची भिती निर्णान होईल . कारण या शहरांना बंद पाईपलाइनने पिण्याचे पाणि मिळेल, त्यामुळे कॅनाँलने या भागात पाणी देण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे या शेतक-यांची शेती उद्धवस्त होण्याची भिती आहे.. त्यामुळे या लढ्यात या तीनही शहरांलगतच्या शेतक-यांनी सामिल होण्याची गरज आहेत . जोपर्यंत लाभधारक शेतक-यांना पाणि मिळत माही तोपर्यंत अशी कोणतीही पाईपलाइन लाभक्षेत्रातुन जावू देणार नाही अशी भुमिका शेतक-यांनी घेतली आहे तर नगर येथे होणाऱ्या आंदोलनात कोणती दिशा मिळणार तसेच निळवंडे कालवे सुरु होवून शिवार भिजणार का ? कि आजही निळवंडे लाभक्षेत्र व येथील बळीराजा हक्काच्या पाण्यावाचून वंचित राहणार याकडे नजरा खिळल्या आहे