Breaking News

धुळे जिल्ह्यात एमएचटी सीईटी परिक्षेच्या अर्जासाठी 25 मार्चपर्यंत मुदत

जळगाव, दि. 19, मार्च - महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात येणारी एमएचटी- सीईटी 2018 ही सामायिक प्रवेश परीक्षा गुरुवार 10 मे 2018 रोजी धुळे येथे जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 25 मार्च 2018 असल्याची माहिती परीक्षेचे जिल्हा संपर्क अधिकारी एम. आर. चौधरी यांनी दिली आहे.

जिल्हा संपर्क अधिकारी चौधरी यांनी म्हटले आहे की, एमएचटी- सीईटी ही परीक्षा शैक्षणिक वर्ष 2018- 2019 मध्ये प्रथम वर्षाकरीता अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी, फॉर्म डी व कृषी विज्ञान, कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी आहे. धुळे जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी एमचटी-सीईटी 2018 करीता प्रवेश अर्ज ऑनलाइन पध्दतीने नियमानुसार शुल्कासह अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 25 मार्च 2018 आहे. या परीक्षेकरीता विलंब शुल्कासहित (500 रुपये) 26 मार्च ते 31 मार्च 2018 पर्यंत अर्ज करता येईल. प्रवेश शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 800 रुपये, तर मागासप्रवर्गासाठी (एससी, एसटी, व्हीजे, डीटी-एनटी (ए)(सी)(डी), ओबीसी, एसबीसी, दिव्यांग) 600 रुपये राहील.
विद्यार्थ्यांना या परीक्षेचे प्रवेशपत्र, 24 एप्रिल ते 10 मे 2018 या कालावधीत विद्यार्थ्यांच्या लॉगइनमधून प्रिंट काढता येईल. याबाबतची संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पोस्ट किंवा कुरिअरने पाठ विलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यासंदर्भात कुठलाही पत्र व्यवहार जिल्हा संपर्क अधिकारी यांच्याद्वारा करण्यात येणार नाही.
संकेतस्थळावर अर्ज करताना विद्यार्थ्यांना कोणतेही मूळ प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यकता नाही. परंतु, सर्व आवश्यक मूळ प्रमाणपत्र अर्ज पडताळणीच्या वेळी तयार ठेवणे अनिवार्य राहणार असल्याचे सांगितले आहे.