Breaking News

साबां भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचे अरविंद सुर्यवंशींचे कुटील प्रयत्न उघड मध्य मुंबईच्या अपहारासंदर्भात वरळीत गुन्हा दाखल

मुंबई/विशेष प्रतिनिधी - मुंबई सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांच्या खट्याळपणाचे विधीमंडळ सभागृहात चांगलेच बाभाडे निघाल्याने मध्य मुंबई साबां विभागाच्या ए.जे.पाटील कृत चोवीस कोटी अपहारासंदर्भात वरळी पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात दाखल कलमांचा तपशील हाती आला नसला तरी मुंबई साबां प्रादेशिक विभागात वेगवेगळ्या मंडळ कार्यालयातील अनियमितता आणि अपहाराचा मुळ स्ञोत अधिक्षक अभियंता कार्यालय असल्याचे विधीमंडळातील चर्चेतून निष्पन्न झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंत्यांपासून कार्यकारी अभियंत्यां पर्यंतच्या कार्य प्रणालीवर अधिक्षक अभियंत्यांचे अंकूश असणे क्रमप्राप्त असतांना वेगवेगळ्या मंडळ कार्यालयात नियमीत निदर्शनास येणारी अनियमितता आणि त्यातून केला जाणारा अपहार या गोष्टी अधिक्षक अभियंत्याला ज्ञात असणे आवश्यक ठरते.अपहार होत आहे हे माहित असतांना जाणीव पुर्वक दुर्लक्ष करणार्या एखाद्या अभियंत्याकडे त्या अपहाराची चौकशी सोपवली गेली तर त्या चौकशीला नैसर्गीक न्याय मिळण्याची शक्यता दुरावते.मुंबई साबां मंडळात गेल्या काही दिवसात उघड होऊन चर्चेत असलेल्या वेगवेगळ्या मंडळ कार्यालयातील अपहार अनियमिततेच्या चौकशीलाही हे परिमाण लागू होत असल्याचे मध्य मुंबई साबां मंडळाच्या त्या चोवीस कोटी अपहारावर आज झालेल्या विधीमंडळ चर्चेतून स्पष्ट झाले आहे.
आ.चरणभाऊ वाघमारे यांनी अन्य साबां मंडळातील अपहाराप्रमाणे मध्य मुंबई साबां मंडळातील कार्यकारी अभियंता ए.जे.पाटील यांच्या कार्यकाळात झालेल्या चोवीस कोटी अपहाराविषयी मुख्यमंञ्यांकडे तक्रार केली होती.मुख्यमंञ्यांच्या आदेशानंतर साबांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई साबां मंडळाचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांना दिले होते.आदेश आला म्हणून चौकशीचे कर्तव्य पार पाडणारे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी सादर केलेल्या अहवालात ए.जे.पाटील यांचा अपहार सिध्द करणारा निष्कर्ष मांडला.या अहवालानंतर या अपहाराला जबाबदार असलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता ए.जे.पाटील आणि त्यांच्या सहअभियंत्यांसह संबंधित कंञाटदारांविरूध्द वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश 6 फेब्रूवारी 2018 रोजी अवर सचिव गो.भ.शिंदे दिले .या आदेशावर अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी तात्काळ गुन्हा दाखल करणे अपेक्षित असतांना वरिष्ठांंचा आदेश पायदळी तुडवून अधिक्षक अभियंत्यांनी एफआयआर दाखल होऊ नृये म्हणून भेटीगाठी सुरू केल्या.याच प्रक्रीयेचा एक भाग म्हणून अपहार दडपण्यात हातखंडा असलेले कार्यकारी अभियंता के.पी.तथा किशोर पाटील यांच्या दि.12 मार्च रोजी झालेल्या गुप्त बैठकीत फिर्याद दाखल होणार नाही आशा पध्दतीने व्युह रचना केल्याची चर्चा आहे.सकाळी 11 ते दुपारी 1 वा.दरम्यान झालेल्या या बैठकीत उपकार्यकारी अभियंता एस.के.पाटील यांना रजा टाकण्याचा सल्ला देऊन मध्य मुंबई साबां विभागात नव्याने रूजू झालेले कार्यकारी अभियंता सांगळे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.त्यानंतर सोमवारच्या सकाळ पर्यंत वेगवेगळ्या पध्दतीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लांबविण्यात आली.
अखेर आ.चरणभाऊ वाघमारे यांनी विधानसभेत हा मुद्दा सोमवारी पुन्हा चर्चेत आणला.आणि अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांचा गुन्हा दाखल करण्याबाबतचा खट्याळपणा चव्हाट्यावर आला.
विधान सभेत हा विषय पुन्हा चर्चेत आल्याने साबांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी आज सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून एफआयआर संदर्भात तातडीची चर्चा केली.त्यानंतर सहा वाजून चाळीस मिनिटांनी बांधकाम सचिव सगणे यांनीही अरविंद सुर्यवंशी यांना एफआयआर संदर्भात निर्देश दिले आणि नाइलाज म्हणून अरविंद सुर्यवंशी यांनी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे.दरम्यान आ.चरणभाऊ वाघमारे यांना मंगळवारी सकाळी एफआयआर अरविंद सुर्यवंशी यांच्याकडून प्राप्त होण्याचे संकेत आहेत.