Breaking News

मुंगी येथे बालआनंद मेळावा उत्साहात


ग्रामीण भागातील शाळा पटसंख्येअभावी बंद करण्याचे शासनाचे धोरण चुकीचे असून त्यामुळे गोरबरीबांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची भावना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी व्यक्त केली. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव गटाच्या जिल्हा परिषद शाळेच्या बालआनंद मेळावा प्रसंगी मुंगी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानांवरून उपाध्यक्षा घुले बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती उपसभापती शिवाजी नेमाने ,जिल्हा परिषद सदस्य संगीता दुसंगे , राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष कैलास नेमाने उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना घुले यांनी सांगितले की आजच्या स्थितीत सरकार न शिक्षकाचा विचार करते न मुलांचा कारण आज सरकारच्या शिक्षकाच्या बदली बाबद धरसोडीच्या भूमिकेने शिक्षक तर कमी पटसंख्येने आपली शाळा बंद होणार या भीतीने पालक हे दोनही घटक अस्थिर आहेत. ग्रामीण भागातील पालक रोजी रोटीच्या शोधात असतात त्यामुळे गोरगरीब मुलांच्या मातापित्यांची भूमिका प्राथमिक शिक्षकच बजावत असतात .त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांचे भवितव्य प्राथमिक शिक्षकाच्या हातात स्थिर असल्याचे घुले यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस स्वप्नील राजेभोसले, व सुनील राजेभोसले यांनी 50 हजार रु किमतीचे प्रोजेक्टर व साउंड सिस्टीम शाळेस भेट दिली. त्याबद्दल त्यांचा उपाध्यक्षा राजश्री घुले यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .या प्रसंगी बोधेगाव जिल्हा परिषद गटातून आलेल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून पाहुण्यांची मने जिंकली. मार्केट कमेटी संचालक राजेंद्र ढमढेरे, जिल्हापरिषद सदस्य संगीता दुसंगे , गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांची यावेळी भाषणे झाली. 

कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य नूतन भोंगळे, सरपंच दादासाहेब भुसारी, ख. वि. संघ संचालक विकास घोरतळे, प्रल्हाद शिंदे, सुधाकर गव्हाणे, सिद्धार्थ दसपुते, सुरेश दुसंगे, मिलिंद गायकवाड,
उपसरपंच गुलाब गव्हाणे, बंडू दसपुते, अशोक कुंढारे विस्तार अधिकारी शैलजा राऊळ, प्रा उषा नरवडे उपस्थित होते. प्रास्ताविक अशोक कचरे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्‍वर काकडे, 
अध्यापक खरात यांनी केले तर आभार गणेश वाघ यांनी मानले.