नगर तालुक्यातील रस्त्यांसाठी चार कोटी मंजूर : आ. औटी
नगर तालुक्यातील वाकोडी, बाबुर्डी घुमट, वडगाव तांदळी, वाळकी येथील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी चार कोटी रूपये मंजूर झाले असल्याची माहिती आ. विजय औटी यांनी दिली.
अनेक दिवसांपासून नगर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरूस्तीची नागरिकांकडून मागणी होती. ही मंजूरी राज्य सरकारच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात मिळाली आहे. चार कोटी रुपये खर्चून रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण करण्यात येणार आहे. नगर तालुक्यातील काही भाग पारनेर विधानसभा मतदार संघाला जोडण्यात आल्यानंतर व त्यापूर्वीही रस्ता दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांची होती.
आ. विजय औटी यांनी या कामासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे या कामास मंजुरी मिळाली आहे. हा रस्ता प्रजिमा 81 या प्रस्तावान्वये करण्यात येणार आहे. या रस्त्यांचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे आ. विजय औटी यांनी सांगितले.