Breaking News

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 01, मार्च - अधिकृत गर्भपात केंद्रांद्वारेच गर्भपात गोळ्या देणे योग्य आहे. तथापी सिंधुदुर्गात काही जनरल प्रॅक्टीशनर्स द्वारे गर्भपात गोळ्या अनधिकृत पणे रुग्णांना दिल्या जातात, ही बाब गंभीर आहे. अशाप्रकारे अनधिकृतपणे गर्भपात गोळ्या देणे हा गुन्हा आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनामार्फत आवश्यक तपासणी करुन कार्यवाही करण्यात यावी अशी आग्रही मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या मासिक बैठकीत करण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी होते. सहाय्यक परिवहन अधिकारी एस.एस.मगदूम, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, सहाय्यक पुरवठा अधिकारी संजय गवस, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त तु.ना.शिंगाडे व्यासपिठावर होते.