Breaking News

राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच पोस्ट खाते सशक्त होईल - खा. ए. टी. पाटील

जळगाव, दि. 01, मार्च - अनेक बँक पतपेढ़या बुडाल्या, पोस्ट खाते ही सेवाभावी वृत्तिची अशी एकमेव संस्था आहे की ज्यामुळे दिवाळखोरीचा विचार तुमच्या मनातसुद्धा येणार नाही.मार्चपासून जळगाव व औरंगाबाद येथे पारपत्र काढण्याची सुविधा होणार आहे, असे प्रतिपादन खासदार ए. टी .पाटील यांनी केले.अमळनेर येथे आयोजित डाक महामेळाव्याप्रसंगी ते बोलत होते .प्रमुख पाहुणेे म्हणून माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डाक अधीक्षक बी. व्ही. चव्हाण होते.


खासदार पाटील पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात मनी ऑर्डर घेऊन येणारा पोस्टमन आजही आठवणीत आहे. खर्‍या अर्थाने पोस्ट हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात मोठी यंत्रणा आहे.देशात 1 लाख 50 हजार एवढी पोस्ट कार्यालये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा विभाग सशक्त करण्यासाठी वाटचाल केली आहे . सर्व राष्ट्रीय बँकांमध्ये जी कामे होतात ती सर्व पोस्ट कार्यालये करतील याच विभागामार्फत बँक बचत खाते,विमा योजना,सुकन्या योजना अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत.याच माध्यमातून एम आर ए जी एस च्या मजुरांना पगारही वाटप होईल.