Breaking News

पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक होणार

सिंधुदुर्गनगरी, दि. 01, मार्च - सिंधुदुर्गनगरी येथे येत्या 6 मार्चला 71 जागांसाठी होणारी पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक होणार असल्याचा विश्‍वास पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी व्यक्त केला. या पोलीस भरतीमध्ये कोणी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन गेडाम यांनी केले. सिंधुदुर्गनगरी येथे ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. कोण व्यक्तीने पैशाची मागणी केल्यास तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन गेडाम यांनी केला. 

सिंधुदुर्गनगरी येथे 6 मार्च 2018 रोजी होणार्‍या 71 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया संदर्भात जिल्हा पोलिसअधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील पोलीस भरती पारदर्शक होणार असून या भरती मध्ये कोणताही उमेदवार दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करणार तसेच कोणी या भरती बाबत पैशाची मागणी केल्यास तात्काळ कळवावे माहिती देणार्‍याचे नाव मात्र गुप्त ठेवण्यात येईल, असे गेडाम यांनी सांगितले. आतापर्यंत आठ हजार 159 अर्ज प्राप्त प्राप्त झाले असून अजूनही उमेदवारी अर्ज येतील असे सांगितले.