परीक्षेत गैरप्रकार करणार्यांना आता कायमची बंदी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न, मोबाइलचा वापर, तोतयागिरीचा प्रयत्न किंवा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करणार्या उमेदवारांवर कारवाई क रण्यात आली आहे. त्यांना दोन ते पाच वर्षासाठी परीक्षेला बंदी, काही विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आल्याचे आयोगाने कळविले आहे.परीक्षा नियमांचे पालन करणार्या उमेदवारांवर कारवाई करण्यापूर्वी त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर कारवाईचे स्वरूप निश्चित केले जाते. दरम्यान, सुमारे 42 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात आयोगाच्या परीक्षेत गैरप्रकारांसाठी काळ्या यादीत टाकलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध क रण्यात आली आहे. ही होमपेज काळ्या यादीतील उमेदवार’ या शीर्षकाखाली जाहीर करण्यात आली, असे आयोगाने कळविले आहे.