Breaking News

जिल्हा विभाजन पालकमंत्र्यांनाच का पाहिजे : डॉ. सुजय विखे


ज्या तालुक्याचे प्रतिनिधीत्व पालकमंत्री करत आहेत, त्या ठिकाणी सगळा प्रभारी राज आहे, पोलिस स्टेशन, पंचायत समिती, तहसील कार्यालय या ठिकाणी अनेक महिन्यांपासून प्रभारी आधिकारी काम करत असून तालूक्यातील 19 ग्रामपंचायतींना ग्रामसेवकच नाहीत अशी परिस्थिती आहे. जिल्हा विभाजनावर केवळ पालकमंत्रीच बोलतात, विभाजनामुळे सामान्य माणसाला काय फायदा होणार आहे. पालकमंत्र्यांच तालुक्यातील सक्षम काम विभाजनावर 500 कोटींवर खर्च आहे. तेंव्हा जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे 300 कोटी अगोदर द्या मग विभाजनावर करा असे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. सर्वस्तरातील उपेक्षितांचे प्रश्‍न समजून घेऊन ते सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे यात कुठलाच राजकीय स्वार्थ नाही. सर्वांचे प्रश्‍न समजावून घेऊन ते सोडविण्यासाठी मी जनसेवा संपर्क कार्यालय आजपासून सुरू करत आहे. ज्यांची जी गरज आहे ती केली पाहिजे, हाच खरा माणूसकी धर्म आहे. हीच माणुसकी विखे घराण्याने जपली आहे. तेच काम मी पुढे करणार आहे असे मत डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केले.
जामखेड येथे जनसेवा संपर्क कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी डॉ. सुजय विखे बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक करण ढवळे, सुधीर राळेभात, सागर सदाफुले, मकरंद काशिद, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, माजी उपसभापती अंकुश ढवळे, राष्ट्रवादीचे संजय वराट, अशोक गिरमे, नगरसेवक अमित जाधव, शिवाजी ढवळे, शरद भोरे, भारत काकडे, गजानन फूटाणे सूनिल शिंदे, शेरखान पठाण, ताहेरखान पठाण, अ‍ॅड. बंकटराव बारवकर, हनिफ कूरेशी, अ‍ॅड. अरूण जाधव, अंबादास पिसाळ, सतीष साळवे, ज्योती गोलेकर, मंगल भूजबळ यांचेसह महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.