Breaking News

भगवान महावीर जयंती उत्साहात


जैन धर्मीयांचे 24 वे तीर्थांकर भगवान महावीर यांची जयंती शहरातही साजरी करण्यात आली, अशी माहिती जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांनी दिली. गुरूवारी सकाळी 8 वाजता जैन स्थानक पासून भव्य मिरवणूक काढण्यात आली, यामध्ये जैन समाजातील अबालवृद्धांपर्यंत सर्व मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जैन स्थानक येथून कोर्ट रोड, नगररोड, महावीर भवन येथे पोहचली. यावेळी भगवान महावीर यांच्या चरित्रावर भाषणे झाली, यावेळी भगवान महावीर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली. महावीर भगवान यांच्या रूपाने संयम शीतल सोळंकी तसेच त्रिशला माता यांच्या रुपात सारिका शीतल सोळंकी यांना लाभ मिळाला. आजच्या लहान मुलांच्या मनात नाटिकाद्वारे समाज प्रभोधन केले. यामध्ये विशेषतः आई वडीलांना फसवून प्रेमाच्या जाळ्यात भरडल्या जाणार्‍या तरुणीची अवस्था नाटकामध्ये दाखवण्यात आली. तसेच स्वछ भारत अभियान हा उपक्रम राबविण्यात आला. जामखेड जैन श्रावक संघ अंतर्गत लहान मुलांची पाठशाळाद्वारे धार्मिक शिक्षण, अहिंसा, परमोधर्म, जगा आणि जगू द्या, असे शिक्षण येथील सी. ए. रवींद्र गादिया यांच्या पत्नी लक्ष्मी गादीया, मंजूश्री गांधी, व आरती शिंगवी या आपल्या घरचे काम करून मुलांना शिकवतात. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. अहमदनगर येथुन आलेल्या ज्योती गांधी, शर्मिला बाफना, नेकनूर हुन आलेले स्वाध्यायी डॉ. विलास कोठारी यांचा संघातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच कोठारी प्रतिष्ठानतर्फे जनावरांना हिरवा चारा देण्यात आला. तसेच या दिवसाचे औचित्य साधून नळीवडगाव येथील वृद्धाश्रम मध्ये सुमित चनोदिया व गणेश भळगट यांनी ज्वारी, गहू व तांदूळ धान्य वाटप करण्यात आले.