Breaking News

कागद प्रकल्पाच्या शेडला आग, ८० लाखांचे नुकसान


कोल्हार -सोनगाव रस्त्यालगतच्या भवतीपुर शिवारात असलेल्या लक्ष्मी पेपर मील या कागद प्रकल्प निर्मितीच्या शेडला आज {दि. ३० } सकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कागदी पुठ्ठे, जेसीबी. पल्प मिलची मशिनरी, प्लस्टिक पाईप आदी ८० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. 

भगवतीपूर शिवारात निखिल खर्डे यांचा लक्ष्मी पेपर या नावाने भागीदारीत कागद निर्मितीचा प्रकल्प आहे. आज सकाळी पेपर मिलजवळ असलेल्या कच्च्या मालाच्या शेडमधून कामगारांना धूर निघतना दिसला. शेड चोहीबाजूने मोकळे असल्याने काहीवेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. याबाबत कामगारांनी खर्डे यांना आगीची घटना कळविली. दरम्यान, उपलब्ध पाण्याच्या साहाय्याने कामगारांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र यात ते कमी पडले. काही वेळाने घटनास्थळी विखे कारखाना, गणेश कारखाना आणि देवळालीप्रवरा नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले. मात्र तोपर्यंत बरेचसे साहित्य आगीच्या भक्षस्थानी सापडले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी भगवतीपूरचे तलाठी आणि नायब तहसीलदार कोताडे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला