Breaking News

आरपीआय आणि एकलव्य संघटनेतर्फे गुरुवारी मेळावा


आश्वी : संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे गुरुवार {दि. ५} आरपीआय आणि एकलव्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दलित, आदिवासी मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आरपीआयचे संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी दिली. एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे व आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी मुबंई येथील नागरी अन्न व ग्राहक संरक्षणचे निवृत्त अधिकारी विनायक शेळके हे राहणार आहेत. यावेळी अशोकराव गायकवाड, श्रावण वाघमारे, बाळासाहेब गायकवाड, किरण ठाकरे, अशोक माळी, विजयराव वाकचौरे, दिपकराव गायकवाड, देविदास माळी, गोरख नाईक, उल्हासराव गायकवाड, अनिल रोकडे, राजेंद्र भालेराव, अशिष शेळके, जालिदर गवळी आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी आश्वी पंचक्रोशी, संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्यातील समाज बांधव व कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.