Breaking News

केजरीवालांचा नितीन गडकरींसमोर माफीनामा

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माफी मागितली आहे. गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात केजरीवाल यांनी खात्री न करता चुकीचे आरोप केल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पतियाळा न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी देखील सुरू होती. मात्र, अचानकपणे केजरीवाल यांनी गडकरी यांना पत्र लिहून माफी मागितली. या पत्रात गडकरी यांच्याबद्दल वैयक्तिक व्देष नसल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.
केजरीवालांच्या माफीनाम्यानंतर गडकरी यांनी पतियाळा न्यायालयात अर्ज दाखल केला असून खटला मागे घेण्यासाठी न्यायालयाकडे विनंती केली.