Breaking News

प्राथमिक शाळेस आग लावण्याचा प्रयत्न


नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेस अज्ञात कडून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सलग दोन दिवस शाळेला सुट्टी असल्याने गुरुवारी सायंकाळी 5 ते 6 वेळेत शाळेतील मागील बाजूला असणार्‍या खिडकी वर पोताडे आणि रॉकेल ओतून पेटवण्यात आले होते. पोत्याने पेट घेतल्याने लाकडी खिडकी पेटली. हा जाळ पाहून परिसरातील नागरिकांनी पळापळ करून ही आग विझवली. याकडे कोणाचे लक्ष नसते तर मात्र पूर्ण वर्गाने पेट पेट घेतला असता. वर्गात किमान 30 ते 35 बेंच असून, इतर शाळेचे साहित्य होते, याचे मोठे नुकसान झाले असते. यातून मात्र ज्ञान देणारे ज्ञान मंदिर पेटवण्या मागचा हेतू समजला नाही. शाळेला सुट्टी असल्याने याभागात गर्दी नाही. याचा फायदा घेऊन शाळा पेटवण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यात ते यशस्वी झाले नाही, जर वर्गाने पेट घेतला असता तर मोठ्या प्रमाणावर शाळेचे आर्थिक नुकसान झाले असते. सकाळी ही बातमी कळताच शाळेतील काही शिक्षक, पोलीस पाटील संजय साठे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ, बापूसाहेब औटी, भिमराज सुरसे, सयाजी शिंदे, शिवाजी पटारे यांसह गावातील अनेक नागरिकांनी या ठिकाणी जाऊन हा प्रकार पाहिला असून, यासंदर्भात ग्रामपंचायत मार्फत नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असून यात दोषी असणार्‍यांंवर रितसर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत होते.