Breaking News

चांदा येथील चर्च प्रांगणात भव्य कीर्तनमाला सप्ताह उत्साहात

नेवासा तालुक्यातील चांदा येथील चर्चमध्ये पवित्र कीर्तनमाला सप्ताह उत्साहात सुरू असून अनेक ख्रिस्ती बांधव या सप्ताहाचा आनंद घेत आहे. सालाबाद प्रमाणे येथील ख्रि.रेव्ह. आर. एच. गायकवाड मेमो. चर्चमध्ये पवित्र कीर्तनमाला सप्ताह होत असून यामध्ये ब्र. वाय. पी. क्षीरसागर (उंबरे) , पा. बी. डी. पहिलवान (घोडेगाव), रेव्ह. एस. व्ही. नाडे (ढोरकीन), रेव्ह. एम. ई. लोखंडे (कुकाना), पा. गोपी वाकचौरे (नाशिक), बी. डी. बळीद (अ. नगर) , रेव्ह. भरत पांडुरंग सूर्यवंशी (लातूरकर) यांच्या कीर्तनाचा लाभ अनेक ख्रिस्ती बांधवांनी घेतला असून गुड फ्रायडे निमित्त सात शब्दावर ब्र. प्रकाश बनसोडे (अ.नगर) यांनी मार्गदर्शन केले. इस्टर संडे निमित्त चांदा गावामधून पहाटे प्रभात फेरीचे ख्रिस्ती बांधवांनी आयोजन केले आहे. तरी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा चांदा व पर्रीसरातील सर्व ख्रिस्ती बांधवांनी लाभ घ्यावा असे अवाहन विश्‍वास भजनी मंडळ, चांदा महिला मंडळ, ख्रिस्त सेवा भजनी मंडळ, दयासागर तरुण मंडळ चांदा यांनी केले आहे.