चैत्रोत्सवापुर्वी फ्युनिक्युलर ट्रॉली कार्यान्वित होण्याची शक्यता धुसर...
कळवण प्रतिनिधी- साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धपिठ असलेल्या सप्तशृंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या बहुप्रतिक्षित उद्घाटनाचा मुहुर्त दोन वेळा टळल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली असुन चैत्रोत्सवाच्या आत ही ट्रॉली सुरु होण्याची शक्यता कमी असल्याने ट्रॉलीच्या उद्घाटनाला दिल्या जात असलेल्या ‘तारीख पे तारीख’ मुळे ट्रॉलीचे काम पुर्ण होवुनही ट्रॉली सुरू होण्यासाठी अजुन काही काळ भाविकांना प्रतिक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत.
देशातील पहिलीच फ्युनिक्युलर ट्रॉली असलेल्या सप्तशृंगी गडावरील या ट्रॉलीचे काम पुर्ण झाले असुन आधीच प्रकल्प पुर्ण होण्यास बराच अवधी लागल्याने व आता ट्रॉली चे काम पुर्ण होवुनही उद्घाटनास मुहुर्त लागत नसल्याने भाविकांनी खेद आश्चर्य व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार असुन त्यासाठी सुरूवातीला दि. 4 मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र तांत्रिक बाबींची पुर्तता न झाल्याच्या कारणामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर दि. 17 मार्च रोजी उद्घाटन निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसाठी नांदुरी येथे हेलिपॅड ही तयार करण्यात येत होते. प्रशासनाने देखील मुख्यमंत्र्यांच्या दौर्याची जय्यत तयारी केली होती. मात्र आदल्या दिवशी हा दौरा रद्द करण्यात आल्याने उद्घाटन पुन्हा रद्द करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द होण्याचे निश्चित कारण समजू शकले नसले अमावस्या असल्याने कार्यक्रम पुढे ढकलल्याची चर्चा भाविकांमध्ये होत होती. चैत्रोत्सवापुर्वी ट्रॉली कार्यान्वित होण्याची आशा भाविकांना होती.
दरम्यान, येत्या 25 मार्च पासुन चैत्रौत्सवाला सप्तशृंग गडावर प्रारंभ होत असुन यात्रौत्सवानिमित्त लाखो भाविक गडावर सप्तशृंगी चरणी नतमस्तक होत असतात. चैत्रौत्सवापुर्वी ट्रॉली कार्यान्वित झाली असती तर अपंग भाविकांसह ज्येष्ठ नागरीकांनाही सुलभ दर्शन घेता आले असते. मात्र चैत्रौत्सवापुर्वी ट्रॉलीचे उद्घाटन होण्याची शक्यता धुसर असुन उद्घाटनाच्या तारीख पे तारीख प्रकाराबद्दल भाविकांनी मात्र कमालीची नाराजी व्यक्त केली आहे.
दोन वेळेस टळले उद्घाटन, तिसर्यांदा तरी मुहुर्त साधणार का?
फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या मंजुरी नंतर हा प्रकल्प कधी पुर्ण होतो याकडे भाविकांचे लक्ष लागले होते. निधी अभावी रेगाळलेला हा प्रकल्प पुर्ण झाल्यानतंर लवकरात लवकर कार्यान्वित होईल अशी भाविकांची अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते उद्घाटनाची तारीख निश्चितही झाली. मात्र एक नव्हे तर दोनदा उद्घाटन रद्द झाल्याने तिसर्यांदा तरी चांगला मुहुर्त काढा अन् उद्घाटन करुन एकदाची ट्रॉली सुरु करा, असे म्हणण्याची वेळ भाविकांवर आली आहे.