Breaking News

निकृष्ट जलवाहिनीच्या दुरुस्तीची एमआयएमची मागणी


शहरातील इक्रानगर भागात काही महिन्यांपूर्वी केलेल्या गटारींचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले आहे, असा आरोप करत या गटारींच्या कामाची चौकशी करून दुरुस्ती करण्याची मागणी एमआयएमचे शहराध्यक्ष इरफान शेख यांनी केली आहे. 
यावेळी स्थानिक रहिवाश्यांनी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांना दिले. या निवेदनात करण्यात आलेल्या गटारींच्या कामाचे सदोष वर्णन करण्यात आले आहे. गटारीचे सांडपाणी रस्त्यावर येणे, भूमिगत गटार न बांधता त्याची उंची रस्त्याच्यावर असणे असे प्रकार घडले आहेत. बहुतेक ठिकाणी गटारी झिरपताना दिसत आहेत. गटारीचे चेंबर व्यवस्थित झाकलेले नाही.

 सर्वत्र पाईप व बांधकामाचे साहित्य विखुरलेले आहे. यामुळे येथील स्थानिक रहिवाशांना याचा त्रास होत आहे. बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी समक्ष येऊन पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणीदेखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.